माझा विशेष : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या योजनांचा भाजप लाभार्थी?

06 Nov 2017 11:51 PM

मराठीतला पोश्टर बॉईझ हा चित्रपट अनेकांना सध्या आठवत असेल. हा चित्रपट चांगलाच होता त्यात वाद नाही. या चित्रपटात नायकांचे फोटो काढले जाता अशाच सरकारी योजनेसाठी पण त्यांना का ते सांगितलं जात नाही आणि थेट नसबंदीच्या जाहिरातीत त्यांचे चेहरे झळकतात आणि पुढे त्या तिघा नायंकांचं जगणं मुश्कील होवून जातं. तसंच काहीसं राज्यात आज घडताना दिसतं. भिवरे गावातल्या शांताराम कटके या शेतकऱ्याचा फोटो जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना काढला तेव्हा तो का कशासाठी याची काहीही माहिती त्यांना नव्हती. आणि थोड्या काळानं आपण सरकारचे पोश्टर बॉय असल्याचं त्यांना कळलं. आणि अशा योजनेसाठी जी आधिच्या सरकारनं मंजुर केलेली होती. हे प्रातिनिधीक उदाहरण आहे मात्र यातून  राज्य सरकारच्या मी लाभार्थी जाहीरातीची पोलखोल झाले. यातल्या अनेक लाभार्थ्यांना ज्या योजनांचा लाभ जाला तो या आधीच्या सरकारमधील आहे. मग श्रेय हे सरकार का लाटतंय असा प्रश्न साहजिकच इथे पडतो. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचे लाभार्थी भाजप असल्याचंचं दिसतं. या श्रेयाच्या लढाईचं वास्तव जाणून घ्यायचा प्रयत्न आजच्या चर्चेत आपण करणार आहोत.

LATEST VIDEOS

LiveTV