माझा विशेष : ताजमहालामध्ये शिवपूजेचा आग्रह कशासाठी?

28 Oct 2017 07:33 AM

जगातलं सातवं आश्चर्य म्हणजेच ताजमहालासमोर होणारं नमाज पठण बंद करावं नाहीतर हिंदूना शिवपूजा करू द्यावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या इतिहास संकलन समितीनं  केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित बालमुकुंद पांडे यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही वादग्रस्त मागणी केली. ताजमहाल हे हिंदू राजानं बांधलेलं शिवमंदिर असल्याचा दावा देखील त्यांनी केला. वास्तविक याच मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय हेरीटेज दर्जा असलेला ताजमहाल गेले काही दिवसांपासून वादात सापडला आहे. जर ताजमहाल हे मंदीर असेल तर पुरावे कुठे आहेत आणि जर पुरावे नाहीत तर ताज महाल हा मकबरा आहे. त्यामुळे तिथे नमाज काय किंवा पूजा काय असले अट्टाहास कशासाठी. ताजमहालाच्या बंद दारांआड काय लपलंय याचं संशोधन आणि खुलासा झाला तर ताजमहाल धार्मिक अस्मितांची युद्धभूमी होण्यापासून मुक्त होईल का... 

LATEST VIDEOS

LiveTV