माल्टा : पनामा पेपर्स घोटाळा उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या

17 Oct 2017 11:45 PM

पनामा पेपर्सचा घोटाळा उघड करणा-या महिला पत्रकाराची माल्टाध्ये हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडालीय. पत्रकार डॅफनी कॅरुआना गलिजिया यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून त्यांनी हत्या करण्यात आलीय. डॅफनी या दक्षिण युरोपातील माल्टा देशात राहत होत्या. डॅफनी आपल्या घरातून उत्तर माल्टाच्या दिशेनं कारमधून जात होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात त्यांचा जागीच मृत्यू झाला. माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनी डॅफनी यांच्या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. डॅफनी यांनी 2016 मध्ये पनामा पेपर्समध्ये माल्टासंदर्भात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते.

LATEST VIDEOS

LiveTV