भिवंडी: 16 गोदामांना लागलेली आग अजूनही धुमसतीच

07 Dec 2017 10:33 AM

भिवंडीच्या प्लास्टिक रॉ मटेरियल्सच्या गोदामाला लागलेली आग 20 तासानंतरही विझवण्यात यश येत नाही.  काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सागर कॉम्प्लेक्समधील एका गोदामाला आग लागली.  मात्र प्लास्टिकमुळे ही आग वेगानं पसरली.  यात आतापर्यंत तब्बल 16 गोदामं जळून खाक झाली आहेत. ज्यात करोडो रुपयांचं नुकसान झालंय.  मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

LATEST VIDEOS

LiveTV