मनमाड : दिल्ली-बंगळुरु कर्नाटक एक्स्प्रेसचा अपघात टळला

03 Dec 2017 10:12 PM


दिल्ली-बंगलोर कर्नाटक एक्सप्रेसचा अपघात टळलाय . मनमाडजवळ या गाडीची कपलिंग अनकपल झाल्याची घटना घडली. गाडी स्थानकात शिरत असल्याने तिचा वेग कमी होता आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्टेशन मास्तर, रेल्वे कर्मचाऱ्यानी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढे गेलेले इंजिन व इतर डबे मागे घेण्यात आले त्या नंतर दुसरी कपलिंग लावून गाडी स्टेशनात आणली.या घटनेमुळे सुमारे अर्धतास गाडीचा खोळंबा झाला. अपघातातून बचावल्याचं कळताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वाःस सोडला

LATEST VIDEOS

LiveTV