माथेरान : नेरळ-माथेरान मिनी ट्रेन लवकरच धावणार, चाचणीला सुरुवात

29 Oct 2017 12:57 PM

माथेरानमधील मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला. या ट्रेनच्या चाचणीला आज सुरूवात करण्यात आली. नेरळ ते माथेरान अशी ही चाचणी करण्यात येते. ही चाचणी यशस्वी झाली तर अमन लॉज ते बाजारपेठ मिनीसेवा सुरू होणार आहे. मे महिन्यात दोन वेळा मिनी ट्रेनचे डबे रुळावरुन घसरल्यानं ही शटल सेवा बंद करण्यात आली होती. माथेरानच्या पर्यटन आणि जनजीवनावर याचा विपरीत परिणाम झाला होता. सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याशिवाय ही सेवा सुरू करणे शक्‍य नसल्याची ठाम भूमिका यावेळी रेल्वे प्रशासनाने घेतली होती. 

LATEST VIDEOS

LiveTV