मेक्सिको : 10 महिन्यांचं तब्बल 28 किलोंचं वजनदार बाळ

17 Nov 2017 08:45 PM


आता एक डोळे विस्फावणारी बातमी... तुम्हांला 10 महिन्यांच्या बाळाचं वजन तब्बल 28 किलो असल्याचं सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना... पण हे खरं ठरलंय मेक्सिकोत... मेक्सिकोतल्या टेकोमॅम शहरात राहणाऱ्या एका 10 महिन्याच्या चिमुकल्याचं वजन तब्बल 28 किलो आहे... या बाळाला नेमकं काय झालंय, याचा अभ्यास डॉक्टर करत आहेत तरी आईनं गरोदरपणात योग्य आहार घेतला नसल्यानं मुलाचं अवाढव्य वजन वाढत असल्याचा निष्कर्ष काही डॉक्टरांनी लावला आहे. तरी येत्या दिवसांत मुलाचं वजन वाढत राहिल्यास त्याच्या जीवाला धोका आहे...त्यामुळे त्या चिमुकल्याला नेमका कुठला आजार आहे हे शोधून त्याच्यावर योग्य उपचार करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागणार आहे. आणि त्यासाठी मुलाच्या कुटुंबियांनी फेसबुकवर पेज तयार करुन मदतीची हाक दिलीय..

LATEST VIDEOS

LiveTV