‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

23 Nov 2017 06:18 PM

‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं स्थान आहे. त्यामुळे तिचा जो डान्स दाखवला आहे. तो काढून टाकावा अशी आमची भूमिका आहे. पण तो सिनेमाच प्रदर्शित होऊ नये या मताचा मी नाही.’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजित न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून पद्मावती सिनेमाबाबत बराच वाद सुरु आहे. अनेक ठिकाणी या सिनेमाला विरोध होत आहे. याच सिनेमाबाबत बोलत असताना रामदास आठवलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

काही नेत्यांनी हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे. पण आठवलेंनी या सिनेमाला विरोध केलेला नसून फक्त त्यातील काही भाग वगळण्याची मागणी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV