सांगली : मिरजेत भटक्या कुत्र्यांचा चार बालकांसह सहा मुलांना चावा

30 Nov 2017 08:36 PM

सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये भटक्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणावप उच्छाद मांडला आहे. आण्णाभाऊ साठेनगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी  चार बालकांसह सहा मुलांना चावा घेतला. या हल्ल्यात कुत्र्यांनी एका चिमुरड्याचा अक्षरक्ष: कान तोडला. तर इतर पाच जणही कुत्र्यांच्या चाव्यात गंभीर जखमी झाले आहेत. या मुलांना मिरजेच्या सरकारी रुग्णालायात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV