मूड महाराष्ट्राचा : जळगाव : तीन वर्षांनंतर फडणवीस सरकारबद्दल जनतेला काय वाटतं?

08 Nov 2017 10:30 PM

फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं आम्ही राज्यातील जनतेची मतं घेऊन पुन्हा एकदा आलोय. सरकारनं दिलेली अश्वासनं पूर्ण झालीत का? सरकारच्या तीन वर्षांच्या कारभारावर सामान्यांचं काय मतं काय आहे. राज्यातल्या 25 हजारांवर गावांना जोडणारी एक गोष्ट म्हणजे आपली एसटी बस, दररोज 70 लाखांवर प्रवाशांच्या सुखदु:खात आपली एसटी सामील असते, एसटीला महाराष्ट्राचा मूड नक्की कळतो त्यामुळेच या हजारातली एक बस आजपासून तुमच्या भेटीला येणार आहे. बघता बघता तीन वर्ष सरली, आश्वासनांची गाडी कुठपर्यंत धावली हे थेट जनतेत जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे मूड महाराष्ट्राचा..

LATEST VIDEOS

LiveTV