चाैकशीचा फार्श करुन मोपलवारांना वाचवण्याचा प्रयत्न, सतीश मांगले यांचा भाजपवर आरोप

13 Oct 2017 09:15 PM

आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय.
तक्रारदार सतीश मांगले यांनी चौकशी समितीच्या अध्यक्षांना लिहिलं पत्र लिहिलंय.
चौकशी समितीला मोपलवार यांच्यावर असलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करतांना मर्यादा असल्याचं या पत्रात नमूद केलंय.
बँक खातं, बेकायदेशीर व्यवहार, खाजगी व्यक्तींची चौकशी करण्याचा या समितीला वैधानिक अधिकार नसल्याचा दावाही पत्रकातून करण्यात आलाय.
राधेश्याम मोपलवार यांची चौकशी फार्स आहे. त्यांना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा मांगले यांचा आरोप आहे. मोपलवार यांचं कथित संभाषण पुढे आलं होतं. यात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याच आरोप आहे.

LATEST VIDEOS

LiveTV