मध्यप्रदेश : होशंगाबादच्या जंगलात पर्यटकांना वाघांनी घेरलं

28 Oct 2017 04:06 PM

तुम्ही जंगलात फिरत असताना वाघांच्या कळपानं तुम्हाला घेरलं तर..? असाच काहीसा प्रसंग मध्य प्रदेशातल्या होशंगाबादच्या जंगलात फिरणाऱ्या पर्यटकांवर आला. इथं एक , दोन नाही तर तब्बल 5 पट्टेरी वाघ पर्यटकांसमोर उभे ठाकले. त्यामुळं पर्यटक घाबरले.
काही काळ हे वाघ त्यांच्या गाडीभोवतीच फिरत होते. काही काळ गाडीभोवती घुटमळल्यानंतर हे वाघ जंगलाच्या दिशेनं निघून गेले. त्यानंतर या पर्यटकांच्या जिवात जीव आला. या घटनेचा सगळ्या व्हिडीओ पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला.

LATEST VIDEOS

LiveTV