ठाणे : दुचाकी अपघातात मुलुंडचे प्रसिद्ध डॉ. प्रकाश वझे यांचा मृत्यू

08 Dec 2017 10:00 PM

मुंबई आणि ठाण्याच्या सीमेवर असलेल्या मुलुंडमध्ये रस्ते अपघातात प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश वझे यांचा मृत्यू झालाय. त्यांचे कम्पाऊंडर नागप्पा हेगडे गंभीर जखमी झालेत. डॉक्टर वझे हे आपल्या कम्पाऊंडरसह स्कूटरवरून मुंबईच्या दिशेनं जात असताना अपघात घडला. स्कूटरचा तोल गेल्यानं ते दोघेही खाली पडले आणि मागून येणाऱ्या ट्रकनं डॉक्टर वझे यांना चिरडलं. रस्ता नीट नसल्यामुळं डॉक्टर वझे यांचा तोल गेल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. दरम्यान डॉक्टर प्रकाश वझे यांची क्रीडाप्रेमी अशी देखील ओळख होती. त्यांच्या मालकीच्या वझे स्पोर्ट्स अकादमीत बुद्धिबळाचं प्रशिक्षण दिलं जातं.

LATEST VIDEOS

LiveTV