मुंबई : मुलुंडमध्ये मॅनहोलची झाकणं चोरणारे दोन चोरटे अटकेत

29 Nov 2017 01:12 PM

मुंबईच्या मुलुंडमध्ये मॅनहोलचे झाकण चोरणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. हयातउल्ला खान आणि शफी उल्ला खान अशी चोरट्यांची नावं असून झाकण खरेदी करणारा इलियाज भंगारवाला सध्या फरार आहे. गेल्याच आठवड्यात मुलुंडमध्ये मॅन होलमध्ये पडून एक महिला जखमी झाली होती. तेव्हाच मॅनहोलची झाकण चोरीला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान मुलुंड पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही हाती लागलं. सीसीटीव्ही मध्ये एक इको टेक्सी या चोरीत वापरली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनीच हि झाकणे चोरल्याची कबुली दिली. हे दोन्ही चोर टेक्सी चालक आहेत. सकाळी टेक्सी चालवायची आणि रात्री याच टेक्सी मधून मुंबई उपननगरात मॅनहोलची लोखंडी झाकणे चोरी करायची.  लोखंडी झाकणांची किंमत सात हजार रुपये असून हे चोर ती झाकणे वाशी नाका परिसरात तीन हजार रुपयांना विकत होती.

LiveTV