सलगच्या सुट्ट्यानंतर मुंबईकर पुन्हा माघारी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि टोलनाक्यावर वाहनांची गर्दी

25 Dec 2017 07:00 PM

तीन दिवसांच्या सलग सुट्ट्या संपवून मुंबईकर पुन्हा आपल्या घरी परतू लागले आहेत. त्यामुळे सध्या मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर वाहतूकीची कोंडी बघायला मिळत आहे. मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहनं धीम्या गतीनं पुढे सरकत आहेत. त्यातचं विटावा-कळवा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या वाहतूक कोंडीत आणखीच वाढ होत आहेत. आधी मुंबईबाहेर पडताना आणि पुन्हा मुंबईत परतताना गेल्या तीन दिवसांत मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोर जावं लागलं. 

LATEST VIDEOS

LiveTV