मुंबई : पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला कंटाळून महिलेची आत्महत्या

24 Nov 2017 09:57 PM

गेल्या काही दिवसात पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे निष्पापांचा जीव गेल्याचा घटना घडत आहे. मात्र, मुलुंडमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घ़डलीय. मुलुंड पश्चिम मध्ये राहणाऱ्या रिया पालांडे या महिलेने गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिस निरिक्षक दामोदर चौधरी, पत्नी भारती चौधरी आणि मुलगी निलाक्षी चौधरी यांच्य़ाविरोधात गुन्हा नोंद केलाय. रिया पालांडेने आत्महत्येपुर्वी घराच्या भिंतीवर भारती चौधरी आणि तिचे कुटुंब माझ्या आत्महत्येस जबाबदार असल्याचं लिहिलंय.

LATEST VIDEOS

LiveTV