मुंबई : हार्बर मार्गावर आज 13 तासांचा मेगाब्लॉक, 100 फेऱ्या रद्द

25 Dec 2017 02:36 PM

लोकलच्या हार्बर रेल्वे मार्गावर आज (25 डिसेंबर) 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते नेरुळपर्यंतच गाड्या धावतील. नेरुळपासून पनवेलपर्यंत गाड्या उपलब्ध नसल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

हार्बर मार्गावर आज 13 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून 100 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून 104 विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

25 डिसेंबरचा मेगाब्लॉक दुपारी तीन वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत केली जाणार आहे. ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेकडून नवी मुंबई महापालिकेकडे अतिरिक्त बस सोडण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV