मुंबईतील 31 टक्के कर्मचारी तणावाखाली जीवन जगतात!

13 Oct 2017 11:21 AM

देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 31 टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन जगत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. लीब्रेट या डॉक्टरांच्या ऑनलाईन सल्लागार संस्थेनं हा सर्व्हे केला आहे. तसेच संपूर्ण देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधील 60 टक्के नागरीक हे तणावाखाली जगत असल्याचही यात म्हटलं आहे.

यामध्ये दिल्ली (27 टक्के), बंगळुरु (14 टक्के), हैदराबाद (11 टक्के), चेन्नई (10 टक्के), कोलकत्ता (7 टक्के) इतकं प्रमाण आहे.

या सर्वेनुसार, मुंबईतल्या नोकरदार वर्गातील व्यक्तींचं तणावाचं मुख्य कारण अपूरा वेळ, दिलेलं काम वेळेत पूर्ण करु न शकणं, मानसिक तणावाशी संघर्ष, ऑफिसमधील राजकारण, ओव्हर टाईम काम करणं, तसेच, प्रोफेशनल जीवन आणि वैयक्तीक जीवनात योग्य संतुलन नसल्याची मुख्य कारणं आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV