मुंबई : दुर्घटनेनंतर कमला मिलमधील रेस्टॉरंस्ट्सकडे थर्टी फर्स्टसाठी मुंबईकरांची पाठ

31 Dec 2017 10:45 PM

चौफेर टीकेनंतर मुंबई महापालिकेनं आज कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करुन तोडकाम सुरु केलंय. कमला मिल आणि रघुवंशी मिल इथले अनधिकृत बार, आणि रेस्टॉरंटस् जमिनदोस्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच चेंबुर आणि बोरिवलीतही कारवाईला सुरुवात झालीय.
परवा कमला मिलमध्ये आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. इथल्या पब आणि हॉटेलमध्ये लागलेल्या आगीमुळं ही दुर्घटना घडली. इथल्या हॉटेल मालकांनी अनधिकृत बांधकाम करुन हॉटेलचा विस्तार वाढवला होता. शिवाय आग भडकू नये, यासाठी कोणतेही सुरक्षात्मक उपाय अंमलात आणलेले नव्हते.

LATEST VIDEOS

LiveTV