मुंबई : आजवरच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची म्हाडाकडून घोषणा

23 Nov 2017 11:03 AM

डोक्यावर हक्काचं छत असावं हे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होण्याची मोठी संधी चालून आली आहे. कारण मुंबईतील गोरेगावच्या पहाडी भागात म्हाडा आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारणार आहे. मुंबईकरांना परवडणारी घरं मिळावी म्हणून 25 एकरात पाच हजार घरांचा भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. 2 हजार 855 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, 952 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी तर 715 सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी आणि उच्च उत्पन्न गटासाठी 537 सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV