मुंबई : मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेसोबत, दगाफटका योग्य नाही, राज ठाकरेंचा संताप

13 Oct 2017 04:09 PM

 ‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.

 

हे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या जबरदस्त खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV