मुंबईत दररोज 700 नवीन वाहनांची नोंदणी

04 Dec 2017 12:33 PM

मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची भर दिवसेंदिवस अधिकच पडताना दिसते आहे. मुंबईत दररोज नवीन 700 वाहनांची नोंदणी होते. सात वर्षांपूर्वी नोंदणीचा हा आकडा 460 इतका होता. 2016 या वर्षात अडीच लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. मुंबईत दादर, अंधेरी आणि चेंबूर भागात सर्वात जास्त वाहनांची नोंदणी होताना दिसते. तर घाटकोपर आणि मुलुंड भागात दुचाकी वाहनांच्या नोंदणीची संख्या जास्त आहे. मात्र असं असलं तरी रस्त्यांची क्षमता आणि आकार वाढलेला दिसत नाही.

LATEST VIDEOS

LiveTV