मुंबई : कर्जमाफीनंतर 4 महिन्यात राज्यात 991 शेतकऱ्यांची आत्महत्या

28 Oct 2017 11:09 AM

देवेंद्र फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. पण भाजपच्या राज्यात शेतकऱ्यांना काही अच्छे दिन आले नाहीत. उलट गेल्या चार महिन्यात तब्बल 991 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
विशेष म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर जून ते सप्टेंबरमध्ये जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी जीवन संपवलं.
धक्कादायक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या विदर्भातून येतात तिथं जवळपास साडेचारशे शेतकऱ्यांनी मरण कवटाळलं.
जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतच्य आकडेवारीवर नजर टाकली तर 2150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

LATEST VIDEOS

LiveTV