स्पेशल रिपोर्ट : मुंबई : पालिकेला अखेर जाग, कमला मिलच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

30 Dec 2017 10:42 PM

2018 च्या नव्या वर्षात जास्तीत जास्त अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचा चंग मुंबई महापालिकेनं बांधलाय..कमला मिलच्या अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यावर महापालिकेला जाग आलीय... लोअर परळच्या कमला मील आणि वरळीच्या रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडतोय...यामध्ये अनेक हॉटेल्स आणि पब्सना जमीनदोस्त केलं जातंय...मात्र महापालिकेनं आधीच खबरदारी घेतली असती तर ही वेळ आलीच नसती...दरम्यान कालच्या दुर्घटनेनंतर  मुंबई महापालिकेच्या 5 अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं... तर जी साऊथ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त  सपकाळ याची तडकाफडकी बदली करण्यात आली...

LATEST VIDEOS

LiveTV