गुजरातमध्ये भाजपला 117 तर काँग्रेसला 64 जागा, एबीपी-सीएसडीएस एक्झिट पोलचा अंदाज

14 Dec 2017 09:54 PM

गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान पार पडलं. यानंतर एबीपी न्यूज-सीएसडीएसचा एक्झिट पोल जाहीर करण्यात आला.

यानुसार सौराष्ट्र-कच्छ, दक्षिण गुजरात, मध्य गुजरात आणि उत्तर गुजरातमध्ये भाजपच स्पष्ट मुसंडी मारेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. 182 जागांपैकी भाजपला तब्बल 117 जागा मिळण्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. तर काँग्रसेला 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

LATEST VIDEOS

LiveTV