मुंबई : पहिली एसी लोकल धावली, सर्वसामान्य प्रवाशांना काय वाटतं?

25 Dec 2017 01:09 PM

नाताळच्या मुहूर्तावर बहुचर्चित एसी लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या यांच्यासह स्थानिक आमदार- खासदार यावेळी उपस्थित होते.

पहिली एसी लोकल बोरीवली स्टेशनहून चर्चगेटसाठी धावली आहे. 25 ते 29 डिसेंबरदरम्यान एसी लोकलच्या फेऱ्या प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहेत. तर 1 जानेवारीपासून 12 फेऱ्या दररोज चालवल्या जातील. यातील 8 फेऱ्या फास्ट, 3 सेमी फास्ट तर 1 फेरी स्लो असणार आहे. तर देखभालीच्या कामासाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकलला सुट्टी असेल.

LATEST VIDEOS

LiveTV