मुंबई : नाताळच्या मुहूर्तावर उद्यापासून एसी लोकल धावणार

24 Dec 2017 02:39 PM

नाताळच्या मुहूर्तावर मुंबईकरांना गारेगार एसी लोकलचा प्रवास करता येणार आहे. बहुचर्चित एसी लोकल उद्या 25 डिसेंबरपासून प्रत्यक्षात धावणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची एसी लोकलची प्रतीक्षा संपणार आहे.

वर्षभरापूर्वी मुंबईत आगमन झालेल्या या लोकलची पहिली फेरी दुपारी 2.10 मिनिटांनी अंधेरी ते चर्चगेटपर्यंत धावणार आहे. भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचे किमान तिकीट 60 रुपये असून कमाल भाडे 200 रुपये राहणार आहे. त्यात जीएसटी अंतर्भूत करण्यात आला आहे.

लोकलमध्ये वाढत्या गर्दीने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना एसी लोकलमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV