मुंबई : बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी उशिरा आल्यास तुघलकी कारवाई नको : आदित्य ठाकरे

02 Dec 2017 09:00 PM

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेवेळी विद्यार्थ्यांसाठी लादण्यात आलेली नवी नियमावली म्हणजे तुघलकी निर्णय असून निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि आमदार कपिल पाटील यांनी या नियमावरुन शिक्षणमंत्री विनोद तावडेंना लक्ष्य केलं आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 1 मिनिटही उशीर झाल्यास परीक्षेला मुकावं लागणार आहे. तसंच परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्येच बसून राहावं लागणार आहे. याच नियमांवरुन आता सरकारवर राजकीय टीकेची झोड उठू लागली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV