मुंबई : काळा घोडामध्ये आर्टिस्ट ऑफ टॅलेंट स्ट्रीट फेस्टिव्हलचं आयोजन

20 Nov 2017 03:51 PM


दर रविवारी मुंबईकरांना आता कलेची मेजवानी मिळणार आहे. जहांगीर आर्ट गॅलरी परिसरात आर्टिस्ट ऑफ टॅलेंट स्ट्रीट फेस्टीव्हलला सुरूवात झाली. महाराष्ट्र पर्य़टन विकास मंडळ आणि मुंबई महापालिकेनं फेस्टिव्हलमध्ये नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. ज्या कलाकारांना आपली कला सादर करायची आहे त्यांचं ऑडिशन घेतली जाते. फेस्टिव्हलमध्ये 21 स्टॉल्स लावण्यात आलेत. रोबोटिक अॅक्टस, स्प्रे पेंटिंग्स, व्यंगचित्र, शिल्पकृती, वारली चित्रकला, दागिने, बाहुल्या यांचं प्रदर्शन या फेस्टिव्हलमध्ये आहे. राज्यातील तळागाळातील कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येतंय. हे व्यासपीठ मे 2018 पर्यंत उपलब्ध असणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV