मुंबई : कमला मिल दुर्घटनेनंतर रुफ टॉपचा निर्णय धोक्यात

31 Dec 2017 11:18 PM

कमला मिलच्या आगीनंतर मुंबई महापालिकेनं मंजूर केलेल्या रुफ टॉप हॉटेलचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त अजॉय मेहतांकडून मंजूर झालेला हा प्रस्ताव रद्द होईल, असं बोललं जातंय.  युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या पुढाकारातून ही संकल्पना पुढे आली.  ज्यात मुंबईतल्या व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल उभारण्याची परवानगी दिली गेलीय.. मात्र कमला मिलमधल्या हॉटेलमध्ये भडकलेल्या आगीत १४ जणांचा जीव गेल्यानंतर रुफ टॉपचा निर्णय अडचणीत आलाय. महत्वाचं म्हणजे हा प्रस्ताव मंजूर करतेवेळी शिवसेना वगळता भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनंही या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता..

LATEST VIDEOS

LiveTV