मुंबई हायकोर्टातील महिलांसाठी पाळणाघराची सुविधा

04 Nov 2017 11:30 PM

उच्च न्यायालयात काम करणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी खास पाळणाघराची स्थापना करण्यात आली आहे. भारताचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या हस्ते या पाळणाघराचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजूळा चेल्लूर आणि महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
हायकोर्टात काम करणाऱ्या महिला इथं आपल्या मुलांना दिवसभरासाठी ठेवू शकतात. मुलांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षित स्टाफचीही नेमणूक करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV