मुंबई : बीग बींची नात आराध्याचा 6 वा वाढदिवस थाटात साजरा

17 Nov 2017 05:48 PM

अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्याची लेक आराध्याचा ६ वा वाढदिवस काल जुहूच्या जे डब्लु मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला... यावेळी बच्चन कुटुंबिय आणि ऐश्वर्याची आईही उपस्थित होती..
यावेळी 6 वर्षांची आराध्या अभिषेक- ऐश्वर्यासोबतच सुंदर अशा बेबी पिंक रंगांच्या फ्रॉकमध्ये दिसली... वाढदिवस साजरा केल्य़ानंतर आराध्याचे आजोबा बिग बी अमिताभ बच्चन आधी हॉटेलबाहेर पडले...त्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन हे आराध्या आणि ऐश्वर्याच्या आईसह हॉटेलबाहेर पडताना दिसले...
कालच बिगबी अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन आराध्याला शुभेच्छा दिल्या होत्या तर आराध्याला बर्थ डे विश करणाऱ्यांचे आभार मानले होते...

LATEST VIDEOS

LiveTV