मुंबई : मेट्रोच्या कामामुळे बेस्टला 30 कोटींचं नुकसान

11 Dec 2017 11:42 PM

मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई मेट्रोवर शिवसेनेनं पुन्हा एकदा निशाणा साधलाय. मेट्रोच्या कामामुळं बेस्टला वार्षिक 30 कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचा आरोप बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी केलाय. मेट्रोसाठी बेस्टचे बसस्टॉप उखडल्यानं बसस्टॉपवरील जाहिरातींचा महसूल बंद झाल्याचं कोकीळ यांचं म्हणणं आहे. तसेच मेट्रो प्राधिकरणानं बेस्टचे बसस्टॉप पूर्वपरवानगीशिवाय उखडल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मेट्रो कामासाठी आतापर्यंत 70 बसस्टॉप उखडण्यात आलू असून आणखी 80 बसस्टॉप हटवले जाणार असल्याची माहिती अनिल कोकीळ यांनी दिली.

LATEST VIDEOS

LiveTV