दिवाळीच्या तोंडावर एसटी आणि 'बेस्ट'कडून संप जाहीर

16 Oct 2017 09:57 PM

एसटी कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संपाचा इशारा दिल्यामुळं, ग्रामीण महाराष्ट्र आणि मुंबईकरांची चांगलीच कोंडी होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने उद्यापासून सुरु होणाऱ्या संपावर एसटी कर्मचारी ठाम आहेत.  सातवा वेतन आयोग तातडीनं लागू करावा, यासाठी राज्य्भरातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. तर तिकडे मुंबई महापालिकेच्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपासाठी भाऊबीजेचा मुहुर्त शोधलाय. दिवाळीचा बोनस न जाहीर झाल्यामुळं बेस्ट संयुक्त कृती समितीनं संपाचा निर्णय घेतलाय. रक्षाबंधनच्या दिवशी मुंबईकरांना वेठीस धरल्यानंतर आता बेस्ट कर्मचारी भाऊबीजेला संपावर जाणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV