मुंबई : महिलांसाठी बेस्टच्या ताफ्यात लवकरच 'तेजस्विनी' बस दाखल होणार

30 Nov 2017 10:12 PM

मुंबईत महिलांसाठी बेस्टच्या ताफ्यात 'तेजस्विनी' बसेस दाखल होणार आहेत. गर्दीच्या वेळी पिक अवरमध्ये या लेडीज स्पेशल बस धावणार आहेत. अशा 50 तेजस्विनी बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 यावेळी या बसेस धावतील. कुलाबा, मंत्रालय, नरीमन पॉईंट, अंधेरी पूर्व, पश्चिम आणि बिकेसी या भागात या बसेस धावणार आहेत. राज्य सरकारकडून बेस्टला आर्थिक मदत करण्यात आली. राज्य सरकारच्या शिफारसीनुसार लवकरच या लेडीज स्पेशल बस रस्त्यांवर धावताना दिसतील.

LATEST VIDEOS

LiveTV