मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळालेला बोनस कापणार, स्थायी समितीची सूचना मंजूर

29 Nov 2017 08:33 PM

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला दिवाळी बोनस आता त्यांच्या पगारातून कापण्यात येणार आहे. स्थायी समितीमध्ये कोणत्याही चर्चेशिवाय प्रशासनाची सूचना मंजूर करण्यात आली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी 5 हजार 500 रुपये बोनस देण्यात आला होता. त्यासाठी मुंबई महापालिकेने बेस्टला 21 कोटी 64 लाख रुपये दिले होते. मात्र, बेस्टमधील आर्थिक सुधारणांची प्रक्रीया तात्काळ सुरु करण्याची अट घातली होती. ही अट पूर्ण न केल्यास दिलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापण्याचं ठरलं होतं. त्यानुसार आता 11 समान हप्त्यांमध्ये बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाणार आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV