मुंबई : भांडुप पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी

12 Oct 2017 04:36 PM

मुंबईतील प्रभाग क्र. ११६मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला. काँग्रेस पक्षाच्‍या तत्‍कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. जागृती पाटील या प्रमिला पाटील यांच्या सून आहेत. मात्र, या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून लढता भाजपचा झेंडा हाती घेतला.

LATEST VIDEOS

LiveTV