मुंबई : तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोलिस स्टेशनमध्ये वाढदिवस साजरा

17 Oct 2017 11:24 AM

मुंबईच्या साकी नाका पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या तरुणाचा वाढदिवस, पोलिसांनी मिठाई भरवून साजरा केला. 28 वर्षीय़ अनिशच्या कारला टेम्पोने टक्कर दिल्यानं गाडी खराब झाली. याची तक्रार दाखल करण्यासाठी टेम्पो चालकासह अनिश पोलिसांकडे गेला. मात्र आपला वाढदिवस अशाप्रकारे पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारण्यात गेला, अशी खंत अनिशनं पोलिसांना बोलून दाखवली. अखेर पोलिसांनीच अनिशचा वाढदिवस पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला.

LATEST VIDEOS

LiveTV