मुंबई : पालिकेच्या मराठी शाळेतून प्रतिवर्षी 8 टक्के विद्यार्थ्यांची घट, प्रजा फाऊण्डेशनचा अहवाल

12 Dec 2017 11:30 PM

प्रजा फाऊंडेशननं मुंबई महापालिकेच्या शाळांविषयी सादर केलेल्या अहवालातून मराठी शाळांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या नऊ वर्षात मुंबई महापालिकेच्या शाळांमधल्या पहिलीतील विद्यार्थीसंख्येत 49 टक्क्यांनी घट झाली आहे.

टॅबसारख्या महत्वाकांक्षी योजना राबवूनही मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबायचं नाव घेत नाही. विशेष म्हणजे मराठी शाळांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये दरवर्षाला विद्यार्थीगळतीचं प्रमाण 8% आहे. सेमी इंग्रजी माध्यमातूनही दरवर्षाला 8% विद्यार्थ्यांची गळती होते.

LATEST VIDEOS

LiveTV