मुंबई : 'चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत महापालिकेचा दोष नाही'

13 Nov 2017 12:39 PM

चेंबूरमध्ये 20 जुलैला घडलेल्या घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेनं हात वर केले आहेत. चेंबूरमध्ये पडलेलं नारळाचं झाड हे जोराच्या वाऱ्यामुळं पडलं. यात महापालिकेचा कोणताही दोष नाही, असं महापालिकेनं एका अहवालातून सांगितलं आहे. महत्वाचं म्हणजे हे झाड धोकादायक असल्यानं लोकांनी याबाबत महापालिकेकडे तक्रारीही केल्या होत्या. मात्र, आता महापालिकेनं या घटनेतून स्वतःला बाजूला करुन घेतलं आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार या झाडाला कीड लागलेली होती. त्यामुळे झाड कोसळण्याची शक्यता असल्यानं लोकांनी याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागात तक्रारीही दिल्या होत्या.

LATEST VIDEOS

LiveTV