मुंबई : बेवारस गाड्या लिलावात किंवा भंगारात, मुंबई मनपाचा निर्णय

12 Dec 2017 11:45 PM

जागा मिळेल तिथे गाडी पार्क करुन ती तशीच सोडून देणाची सवय असणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गाडीच्या बाबतीत अशी हलगर्जी केल्यास तुमची गाडी काही दिवसातच भंगारामध्ये जमा होऊ शकते.

बेवारस गाड्या तशाच सोडून बरेच दिवस त्याचा ताबा घेण्याचीही तसदी न घेणाऱ्या मुंबईकरांना आता धडा शिकवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.

नोटीस देऊनही दोन दिवसांत बेवारस गाडी हटवली गेली नाही, तर ती जप्त केली जाईल. जप्त केलेल्या वाहनांचा ताबा जर एक महिन्यात घेतला गेला नाही, तर अशा वाहनांचा थेट लिलाव केला जाईल. लिलावातही अशी वाहनं पडूनच राहिली, तर मात्र त्यांची भंगारात विक्री केली जाईल.

LATEST VIDEOS

LiveTV