मुंबई : लोअर परेलमध्ये बीएमडब्लू कार पेटली, चिमुकली थोडक्यात बचावली

14 Nov 2017 09:54 AM

मुंबईत पेटत्या बीएमडब्ल्यू कारमधून 5 वर्षाच्या छोट्या मुलीचा थोडक्यात जीव वाचला. काल सकाळी 7 वाजता लोअर परेल परिसरात ही घटना घडली. मॅरेथॉन एरा बिल्डिंगमध्ये राहणारे संजय त्रिपाठी आपल्या मुलीला शाळेत सोडवण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडी खाली आगीच्या ठिणग्या पडत असल्याची बाब वॉचमनच्या लक्षात आली. तात्काळ ही बाब त्याने लक्षात आणून दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

LATEST VIDEOS

LiveTV