मुंबई : देवनार भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, तिघांना अटक

25 Nov 2017 09:06 AM

देवनारमध्ये प्रदीप जाधव या तरुणाचा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्यानंतर या भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नेहरुनगर, गोवंडी, टिळकनगर, मानखुर्द भागातून 3 बोगस डॉक्टरांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये जहीर बशीर अहमद शेख हा बारावी पास, फर्मन अली जाहीद हुसेन हा अकरावी पास, तर असिफ हुसेन वली अहमद शेख हा चक्क आठवी पास असल्याचं उजेडात आलय. हे सर्वजण अन्य डॉक्टरांची पदवी वापरुन प्रॅक्टिस करत होते.

LATEST VIDEOS

LiveTV