मुंबई : 'ब्रेव्ह अँड डेअर' गेममधून अल्पवयीन मुलीची फसवणूक

07 Nov 2017 12:00 AM

मुंबईत अल्पवयीन मुलीला 'ब्रेव्ह अँड डेअर' गेमच्या फास्यात अडकवून तिचे अश्लील फोटो सोशल साईटवर अपलोड केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी गुजरातमधील एका 23 वर्षीय तरुणाला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरी भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधील तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर  'ब्रेव्ह अँड डेअर' गेम खेळत या मुलीने आपले अश्लील फोटो तरुणास शेअर केले. मात्र या तरुणाने मुलीचे फोटो सोशल साईटवर पोस्ट केले.  ही बाब समजताच मुलीच्या वडिलांनी अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासानंतर पोलिसांनी तरुणाला गुजरातमधून अटक केली. दरम्यान हा प्रकार 'ब्रेव्ह अँड डेअर' गेममुळेच झाला का? याच तपास पोलीस करत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV