मुंबई : एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर, मुंबई सेंट्रल बसस्थानकावर प्रवासी खोळंबले

17 Oct 2017 10:18 AM

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. 17 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

या संपात  मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संपात कामगार सेना सहभागी होणार नाही. कामगार सेनेचे कर्मचारी कामावर जातील.

ऐन सणासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईतल्या मुंबई सेंट्रल डेपोतून रात्री 11 नंतर एसटी बसेस गाड्या बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV