मुंबई : छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून 20 कोटींची संपत्ती जप्त

06 Dec 2017 01:12 PM

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडीने त्यांची 20 कोटी 41 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यात नाशिक, पुणे, मुंबईतील बंगला, फ्लॅट आणि कार्यालयाचा समावेश आहे. सक्तवसूली संचालनालयाने मनी लॉड्रिंगप्रकरणी ही कारवाई केली. यापूर्वीही भुजबळ यांची जवळपास 150 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

LiveTV