स्पेशल रिपोर्ट : सर्वांना सामावून घेणारी आपली मुंबई देशातील सर्वात असुरक्षित शहर!

01 Nov 2017 10:24 AM

देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई हे असुरक्षित शहरांच्या यादीत जगात अनुक्रमे 18 आणि 16 व्या क्रमांकावर आहेत.

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने ‘सेफ सिटीज इंडेक्स 2017’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार जगातील 60 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आरोग्य, पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तित सुरक्षितता या मुद्द्यांवरुन जगातील 60 शहरं निवडण्यात आली.  या यादीत असुरक्षिततेत मुंबई 16 व्या तर दिल्ली 18 व्या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे सुरक्षित शहरांमध्ये जपानमधील टोकियो हे अव्वलस्थानी, तर सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.  सुरक्षित देशांच्या यादीत दिल्ली 43 व्या तर मुंबई 45 व्या क्रमांकावर आहे.

LATEST VIDEOS

LiveTV