मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी चौकशी समितीकडून रेल्वे अधिकाऱ्यांना क्लीनचिट

11 Oct 2017 05:39 PM

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी चौकशी समितीनं रेल्वे अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे. दुर्घटनेचं खापर पाऊस, गर्दी आणि अफवेवर फोडण्यात आलं. दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या चौकशी समितीनं आज अहवाल सादर केला. एका प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार फुल गिर गया ही हाक लोकांनी पूल गिर गया अशी ऐकली आणि एकच अफवा उठल्याचं अहवालात म्हटलंय. चौकशी समितीनं 30 प्रत्यक्षदर्शी, 28 जखमी आणि 15 रेल्वे कर्मचाऱ्यांचे जबाब याप्रकरणी नोंदवलेत. तसंच स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आलं. केवळ 5 ते 6 मिनिटांमध्ये ही सर्व दुर्घटना घडल्याचं चौकशी समितीनं म्हटलं आहे.
मुख्य सुरक्षा अधिकारी आणि 4 रेल्वे अधिकाऱ्यांच्या अध्य़क्षतेखाली ही चौकशी करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV