मुंबई : तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणाचा पोलिसांकडून वाढदिवस साजरा

16 Oct 2017 06:03 PM

आजपर्यंत आई-वडिलांनी, मित्र-मैत्रीणींनी तुमचे वाढदिवस साजरे केले असतील...मात्र पोलिसांनी कधी तुमचा वाढदिवस साजरा केल्याचं ऐकलंय? साकी नाका पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या तरूणाचा वाढदिवस, पोलिसांनी मिठाई भरवून साजरा केलाय. 28 वर्षीय़ अनिशच्या कारला टेम्पोने टक्कर दिल्यानं गाडी खराब झाली. याची तक्रार दाखल करण्यासाठी टेम्पो चालकासह अनिश पोलिसांकडे गेला. मात्र आपला वाढदिवस अशाप्रकारे पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारण्यात गेला, अशी खंत अनिशने पोलिसांना बोलून दाखवली. अखेर पोलिसांनीच अनिशचा वाढदिवस पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला.

LATEST VIDEOS

LiveTV