मुंबई : विधानपरिषदेच्या एका जागेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसची खलबतं

26 Nov 2017 02:09 PM

विधानपरिषदेच्या एका जागेसाठीची निडवणूक 7 डिसेंबरला होतेय.. आणि त्यादृष्टीनं काँग्रेसनं दुपारी दोन वाजता एक महत्त्वाची बैठक बोलवलीय.. विधानपरिषद निवडणूकीत अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसचे सगळे मोठे नेते या बैठकीला हजर असतील. भाजपकडून नारायण राणेंनी उमेदवारी दिली जाते की नाही यावर काँग्रेसचा उमेदवार ठरणार आहे.. जर भाजपने राणेंना उमेदवारी दिली तर शिवसेनाही आपला उमेदवार रिंगणात आणू शकते.. त्यामुळे त्यादृष्टीनेही काँग्रेसच्या या बैठकीत खलबतं रंगू शकतात..

LATEST VIDEOS

LiveTV